साडे तीन वर्षानंतर एनजीटीची सुनावणी ; ए. सत्यनारायण यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती

सध्या न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी येथील दाव्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे दिल्लीत सुनावणी सुरू आहे. त्यासाठी दिवसातील केवळ १०.३० ते ११ असा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात येत आहे. यावेळेत केवळ तत्काळ व महत्त्वाच्या दाव्यांवरच सुनावणी होते.

    पुणे : न्यायाधीशांची नियुक्ती झाल्याने पुण्यातील राष्ट्रीय हरीत लवादाचे (एनजीटी) कामकाज कालपासून ( ता. २ ) सुरू करण्यात आली आहे. लवादच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीस विलंब झाल्याने एनजीटीमधील सुनावण्या प्रलंबित राहील्या हाेत्या. ए. सत्यनारायण यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली असुन, सुनावणी गतीने हाेण्याची शक्यता आहे.

    न्यायाधीशांची नियुक्ती झाली असली तर तज्ज्ञ सदस्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे भोपाळ एनजीटीमधील तज्ज्ञ सदस्य येथील सुनावणीसाठी उपस्थित असणार आहेत. पर्यावरणीय दावे त्वरित निकाली लागून त्याद्वारे निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी देशातील सर्वच एनजीटीमध्ये न्यायाधीश, अध्यक्ष आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती व्हावी, अशी याचिका येथील एनजीटी बार असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर तीन वर्ष सुनावणी झाल्यानंतर देशातील सर्व एनजीटीमध्ये एप्रिलमध्ये चार न्यायाधीश आणि तीन तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीश व तज्ज्ञांच्या नियुक्तीबाबत कालमर्यादा देखील निश्‍चित करण्यात आली होती. मात्र ती पाळली गेली नाही.

    सध्या न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी येथील दाव्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे दिल्लीत सुनावणी सुरू आहे. त्यासाठी दिवसातील केवळ १०.३० ते ११ असा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात येत आहे. यावेळेत केवळ तत्काळ व महत्त्वाच्या दाव्यांवरच सुनावणी होते. दावा दाखल केल्यानंतर त्यावर वेळेत निकाल होणार नाही, अशी मानसिकता दावेदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत एनजीटीमध्ये दावे दाखल करण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.