पूर्व हवेली पट्ट्यात कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण

लोणी काळभोर : पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह नागरिकांची चिंता वाढवणारी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी सोमवारी (ता. २२) सायंकाळी पुढे आली आहे. थेऊर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी व

लोणी काळभोर : पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह नागरिकांची चिंता वाढवणारी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी सोमवारी (ता. २२) सायंकाळी पुढे आली आहे. थेऊर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी व कोरेगावमुळ या चार गावात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

  पूर्व हवेलीत दिवसभरात आढळून आलेल्या नऊ कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या थेऊर गावामधील तब्बल पाच रुग्णांचा समावेश आहे. तर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत दोन, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर या दोन गावात प्रत्येकी एक असे चार रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एकाच दिवसात पूर्व हवेलीमधील चार गावात नऊ रुग्ण आढळून आली असल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली आहे.

    तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर गावातील एक २७ वर्षीय तरुण लोहगाव परिसरात हॉटेल चालवतो. या तरुणास मागील दोन दिवसांपासून घशाचा त्रास जाणवू लागल्याने, त्यास लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या उपचारादरम्यान वरील तरुणाची स्वॅब (घशातील द्रव) ची तपासणी केली असता, संबंधित तरुण कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले. 

हा तरुण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच, कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबुब लकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या घरातीत नातेवाईक व भाडेकरु अशा बारा जणांची स्वॅब चाचणी लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरकडे पाठवली. यात वरील कोरोनाबाधित २७ वर्षीय तरुणाचे वडील, दोन भाडेकरु महिला व पुरुष भाडेकरू असे चार जण कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन्न झाले.

  तर दुसरीकडे कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा परीसरातील एका बड्या हॉटेलमध्ये पत्ते खेळण्यासाठी येत असलेल्या दोन जनांना कोरोना झाल्याचे निस्पन्न झाले. या दोनपैकी एक जण लोणी काळभोर ग्रामपंचायतीचा माजी सदस्य तर उर्वरीत दुसरा हा हॉटेलचा व्यवस्थापक निघाला. तर कुंजीरवाडी येथील रहिवाशी मात्र हडपसर येथील एका खाजगी कंपनीत काम करणारा एक चाळीस वर्षीय कामगारही कोरोनाबाधीत असल्याचे सोमवारी सायंकाळी आढळुन आले आहे. तसेच कोरेगाव मुळ येथील एक बत्तीस वर्षीय महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन झाले. ही महिला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात काम करते. 

 याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरमधुन सोमवारी दिवसभरात त्रेचाळीस जनांचे स्वॅब (घशातील द्राव) तपासनीसाठी पाठवले होते. यात दहा जण कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले आहे. यात दहापैकी पाच जण एकट्या थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील नागरीक आहेत. उर्वरीत पाच जण कुंजीरवाडी, कोरेगाव मुळ, भिलारेवाडी, लोणी काळभोर या गावातील रहिवाशी आहेत. एकाच दिवसात पुर्व हवेलीत नऊ रुग्न आढळुन आल्याने, पुर्व हवेलीवरील कोरोनाचा धोका वाढला आहे. नागरिकांनी आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.