बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी निता फरांदे

निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.दरम्यान सभापतीपदासाठी फरांदे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी निता फरांदे यांची सभापती पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

    बारामती : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी मुरुम(ता.बारामती)येथील निता नारायण फरांदे यांची निवड करण्यात आली .बारामती पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सभापतीपदी निता फरांदे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.दरम्यान सभापतीपदासाठी फरांदे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी निता फरांदे यांची सभापती पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

    याप्रसंगी मावळत्या सभापती निता बारवकर यांनी निता फरांदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपसभापती प्रदीप धापटे, सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे,तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, संजय भोसले, रोहित कोकरे ,राहुल झारगड, सदस्या अबोली भोसले,शारदा खराडे, मेनका मगर,लिलावती गावडे,तालुका पदाधिकारी,मावली कदम, गौतम काकडे, शब्बीर शेख, सोमनाथ कदमत्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील तसेच गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.