रयत शेतकरी संघटनेचे तालुका कार्यध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र स्वीकारताना नितीन इंगळे,सह संघटनेचे पदाधिकारी.
रयत शेतकरी संघटनेचे तालुका कार्यध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र स्वीकारताना नितीन इंगळे,सह संघटनेचे पदाधिकारी.

वाघोली : रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या हवेली तालुका कार्यध्यक्ष पदी वाडेबोल्हाईचे सामाजिक युवा कार्यकर्ते नितीन विलास इंगळे यांची निवड झाली.ही निवड रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व अधिपत्याखाली ही निवड पार पडली.

रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल व जिल्हा उपाध्यक्ष सुशील शिंदे यांच्या हस्ते इंगळे यांना या निवडीचे जाहीर नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पूर्व हवेली तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल,पश्चिम हवेली तालुकाध्यक्ष देविदास भोरडे,तालुका उपाध्यक्ष सुभाष तिकोळे,तालुका सचिव संदीपान भोरडे,शिरूर तालुकाध्यक्ष अविनाश रासकर,उपाध्यक्ष अनिकेत भुजबळ,अष्टापुरचे माजी सरपंच दादासाहेब कोतवाल,पोलीस पाटील कैलास कोतवाल,समीर सावंत,विलास कोतवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.नितीन इंगळे यांनी वाडेबोल्हाई परिसरात केलेल्या सामाजिक कार्यांचा आढावा घेऊन व शेतकऱ्यांविषयी असलेले विविध प्रश्न,समस्या सोडविण्याची तळमळ पाहून त्यांची हवेली तालुक्याचा कार्यध्यपदी निवड केली आहे.