जेजुरी गडावर No Entry ; खंडेरायाची माघी पौर्णिमेची यात्रा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेजुरीच्या खंडेरायाची माघी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द केल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    जेजुरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेजुरीच्या खंडेरायाची माघी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द केल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    येणाऱ्या शनिवारी माघी पौर्णिमा आहे. त्यादिवशी खंडेरायाची यात्रा भरते. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे या यात्रेसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. खंडेरायाचे मंदिर देखील भाविकांसाठी असणार आहे.

    शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मंदिर भाविकांसाठी बंद असेल. प्रवेश रोखण्यासाठी जेजुरी गडाच्या पायथ्याशी बॅरिकेट्स बसवण्यात येणार आहेत. गडावर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले. मंदिर जरी भाविकांसाठी बंद असलं तरी धार्मिक विधी हे नित्यनेमाने केले जातील असेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.