कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही : सुप्रिया सुळे

मुंबई (Mumbai) आणि बॉलिवूडचं (Bollywood) दुधात साखर विरघळल्यासारखं नात आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितलं आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) बुधवारी मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) येणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (BSE) जाणार आहेत. मुंबईमध्ये येताच बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood Celebrity) आणि उद्योजकांशी ( Entrepreneur) गंतुवणूक करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

मुंबई (Mumbai) आणि बॉलिवूडचं (Bollywood) दुधात साखर विरघळल्यासारखं नात आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितलं आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, कार्यकर्ते आणि संघटना नीट ठेवण्यासाठी सरकार पडणार असल्याचं विरोधक बोलत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.