आता मूक मोर्चा नव्हे तर बोलका मोर्चा काढणार; विनायक मेटे यांचा इशारा…

मराठा आरक्षण रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. त्यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल. तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.

  पुणे : भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याच प्रश्नावर मूक नव्हे तर बोलका मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

  त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या कठीण काळात मोर्चे काढू नका असं सांगितलं असताना दूसरीकडे मात्र मराठा समाज आक्रमक झाला आहे. विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला.

  विनायक मेटे काय म्हणाले ?

  मराठा आरक्षण रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला आहे. त्यामुळेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचा मूक मोर्चा नसेल. तो बोलका मोर्चा असेल. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहोत, असा इशारा मेटे यांनी दिला आहे. खासदार संभाजी छत्रपती चांगलं काम करत आहेत. पण त्यांनी अजूनही भूमिका घेतलेली नाही. येत्या 27 मे रोजी ते भूमिका घेणार आहेत. असं असलं तरी ते चांगलं काम करत आहेत. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्यावर अधिक बोलता येईल, असं ते म्हणाले.

  विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका

  दरम्यान यावेळी त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. विजय वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता होण्याची घाई झाली आहे. त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत नाही, अशी टीका मेटे यांनी केली. काँग्रेसमध्ये ओबीसी नेता होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वडेट्टीवार मोठे की नाना पटोले मोठे यावरून काँग्रेसमध्ये वाद आहे, असा दावाही मेटे यांनी केला आहे. त्यांनी केला.