‘नीरा ग्रामपंचायत निवडणूक आताच नको, आधी नगरपरिषदेत रूपांतर करा’ ; सर्व पक्षांची मागणी

नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नीरा ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या होत आहे. माळेगाव ग्रामपंचायतीच्या धर्तीवर निरा ग्रामपंचायतीचेसुद्धा नगरपरिषदे मध्ये रूपांतर करावे .अशी मागणी करत नीरा ग्रामपंचायतीची सध्याची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी निरा येथील सर्व पक्षांच्या प्रमुखांनी केली आहे.

नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नीरा ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या होत आहे. माळेगाव ग्रामपंचायतीच्या धर्तीवर निरा ग्रामपंचायतीचेसुद्धा नगरपरिषदे मध्ये रूपांतर करावे .अशी मागणी करत नीरा ग्रामपंचायतीची सध्याची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी निरा येथील सर्व पक्षांच्या प्रमुखांनी केली आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या २२ ते २५ हजार लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे निरा ग्रामपंचायतीच्या उपायोजना अपुऱ्या पडत आहेत. त्याच बरोबर निरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील गावठाणाचा प्रश्न सुद्धा अनेक वर्षे प्रलंबित आहे. नीरा गावठाण नसल्याने येथील लोकांचा घरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावठाण नसल्याने तसेच बीगर शेती नसल्याने येथील लोकांना घरबांधणीसाठी बँकांना कर्ज देता येत नाही. तसेच इतर शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर निरा येथील ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या उपायोजना लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या पडत आहेत. हे सर्व व्यवस्थित करायचे असेल तर निरा ग्रामपंचायतीचे रुपांतर निरा नगर परिषदेमध्ये करा . भले तर ग्रामपंचायतची निवडणूक तीन महिने पुढे ढकला. अशी मागणी निरा येथील सर्वच प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षा कडून करण्यात आली आहे. काल नीरा येथे सर्वच प्रमुख पक्षांची अध्यक्षांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. याला सर्वच पक्षांच्या अध्यक्षांनी पाठिंबा दिला. याबाबतची माहिती सर्व पक्षाचे अध्यक्षांनी पत्रकारांना दिली. असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज लेखी देवी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे, नीरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष हरिभाऊ जेधे, नीरा शहर भाजपचे अध्यक्ष सचिन बरकडे, निरा शहर शिवसेनेचे दयानंद चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादीचे जिल्हा हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे नीरा ग्रामपंचायतचे सदस्य अनिल चव्हाण भाजपचे तालुका विस्तारक आण्णा माने यांनी याबाबत आग्रही मागणी केली आहे. निरा येथील नीरा विकास आघाडी व चव्हाण पॅनल या प्रमुख गटाकडून सुद्धा निरा ग्रामपंचायतीच्या ऐवजी निरा नगरपरिषद व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात येत आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी काही ग्रामपंचायती नगरपंचायती मध्ये रुपांतरीत केल्या. त्याच धर्तीवर निरा ग्रामपंचायतीचे सुद्धा नगरपरिषद मध्ये रूपांतर करावे आणि नंतरच निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी आता लोकांकडून होताना दिसते आहे.