उपसरपंचपदी कायम राहण्यास थिटे यांचा मार्ग मोकळा शिक्रापूर : केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तात्रय ज्ञानेश्वर थिटे यांच्यावर बारा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला

उपसरपंचपदी कायम राहण्यास थिटे यांचा मार्ग मोकळा
शिक्रापूर :
केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तात्रय ज्ञानेश्वर थिटे यांच्यावर बारा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. त्यावर अठरा जून रोजी मतदान घेण्यात येणार होते. शासनाने कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास सहा महिने बाकी असताना अविश्‍वास ठराव दाखल करता येत नसल्याचा निर्वाळा तहसीलदार लैला शेख यांनी दिल्यानंतर केंदूरच्या अविश्वास ठरावावर मतदान झाले नसून उपसरपंचपदी कायम राहण्यास थिटे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तात्रय थिटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस असल्याने  या अविश्वास ठरावा कडे सर्वांचे लक्ष लागले होते. उपसरपंच थिटे यांच्यावर ११ जून रोजी बारा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार १८ जून रोजी अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान घेण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायत अधिनियम कायद्यामध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आली असून केवळ सहा महिने बाकी आहेत अशा मुदतीमध्ये अविश्‍वास ठराव दाखल करता येणार नाही अशी तरतूद असल्याने यावर कुठलीही चर्चा व मतदान न होता सभा  संपली, त्यामुळे दत्तात्रय थिटे यांचा  उपसरपंच पदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला या सभेसाठी सरपंच वंदना राजाराम ताठे, संगीता गावडे, रूपाली ताठे, विद्या साकोरे, विद्या थिटे, जयश्री सुक्रे, समिंद्रा  गावडे, योगिता साकोरे, अभिजीत साकोरे, भाऊसाहेब पऱ्हाड, अंकुश पऱ्हाड, शिवाजी भोसुरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

-कायदेशीर लढाई जिंकली – दत्तात्रय थिटे
माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला असला तरी कायदेशीर तरतुदीनुसार सहा महिन्याच्या आत  अविश्वासच ठराव आणता येत नव्हता याच स्वरूपाचा निकाल आल्याने मी काही कायदेशीर लढा जिंकला आहे. माझ्या बाजूने बहुमताने  सदस्य होते मतदानाचा प्रसंग आला असता तरी ठराव फेटाळला गेला असता असे उपसरपंच दत्तात्रय थिटे  यांनी सांगितले.