no water supply

एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत काम सुरु राहणार आहे.

    राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.८) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी दिली.

    एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत काम सुरु राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.९) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.