रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किंमतीने विकणाऱ्या ४ खासगी हॉस्पिटलला नोटिसा

सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या अशा प्रथेमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची सखोल चौकशी करुन पुढील ४८ तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा असे नोटीसीत नमुद केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आपणा विरूध्द आवश्यक कारवाई का करू नये असे देखील नोटीसीत म्हटले आहे.

    पिंपरी: रेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णालयाबाहेर ऍ़डमिट असलेल्या रूग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील तीन रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तीन रूग्णालयांमध्ये आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलचे अधिष्ठीता तथा वैद्यकिय अधिक्षक यांचा समावेश आहे.

    सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या अशा प्रथेमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची सखोल चौकशी करुन पुढील ४८ तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा असे नोटीसीत नमुद केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आपणा विरूध्द आवश्यक कारवाई का करू नये असे देखील नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शन चा तुटवडा आणि काळाबाजारच्या आरोपांनंतर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाई मुळे खासगी हॉस्पिटल्स मध्ये खळबळ उडाली आहे.