Dont give bonus by breaking pune municipal Corporations deposits Ujjwal Keskar

     दरम्यान, मागीलवर्षी राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने आज यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाल्यास पुणे महापालिकेची भौगोलिक हद्द ही ४५० कि.मी. पेक्षा अधिक होणार आहे

पुणे : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज २३ गावे पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात पुढील महिन्याभरात विभागीय आयुक्तांकडे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर गावे समाविष्ट करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द ४५० चौ.कि.मी.ची होणार असून क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे.
हद्दीवरील ३४ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यासंदर्भात १८ डिसेंबर २०१३ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय होउन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान मे मध्ये राज्यात सत्ता बदल झाला. गावे समाविष्ट करण्यासंदर्भात या गावांमधील नागरिकांनी स्थापन केलेल्या कृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी राज्य शासनाने  विहीत मुदतीत टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. त्यानुसार २०१७ मध्ये ११ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. तेथे निवडणुकही घेण्यात आली असून महापालिकेच्यावतीने या गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, मागीलवर्षी राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने आज यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाल्यास पुणे महापालिकेची भौगोलिक हद्द ही ४५० कि.मी. पेक्षा अधिक होणार आहे. गावे समाविष्ट करताना राज्य शासनाने या गावातील विकासासाठी निधी द्यावा. तसेच या गावांमध्ये पीएमआरडीएच्यावतीने देण्यास आलेल्या विकास परवानग्यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून काही हिस्सा या गावातील विकासकामांसाठी द्यावा, अशी मागणीही महापालिकेने शासनाकडे केली आहे.

     समाविष्ट होणारी २३ गावे
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे – धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्‍हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली.

    अशी असेल महापालिका हद्द
उत्तरेस – कळस, धानोरी, लोहगाव, उत्तर पुर्वेस लोहगाव, वाघोली, पुर्वेस मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, फुरसुंगी, दक्षिण पुर्वेस उरूळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, दक्षिणेस धायरी, वडाची वाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी, दक्षिण पश्‍चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी, कोपरे, पश्‍चिमेस कोंढवे धावडे, बावधन बुद्रुक, म्हाळुंगे, सुस आणि पश्‍चिम उत्तरेस बाणेर, बालेवाडी या गावांची महसुली हद्द.