आता चंद्रकांत पाटील  यांचे ‘पुन्हा येईन’!

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर खुलासा केला आहे. आपण पुण्यात स्थायिक नसून कोल्हापूरला जाणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते.  मात्र मी कोल्हापूरला जाणार असल्याच्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये, मी पुन्हा येईन असा खुलासाच त्यांनी केला आहे. आपल्या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चा झाल्याने खुलासा देत असल्याचे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, माझे वाक्य असे होते की केंद्राने मला दिलेले मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असेच पुण्यात पाठवले नाही.” “माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचे असते. त्यासाठी माशेलकरांना गिरीश बापट यांनी पुणे सेटल होण्यासाठी चांगले असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटले की पुणे खूप चांगले आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर मी कोल्हापूरला जाईन. त्यासाठी १५ किंवा २० वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते म्हणाले की, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी १९८०मध्ये घर सोडले होते. पुढच्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. मला सेटल व्हायला २२०० लोकसंख्येचे खालापूर आवडेल. मला फक्त कोथरूडची निवडणूक लढवण्यासाठी पाठवले नाही, मला जे करायचे आहे ते खूप मोठे आहे. कालचा संदर्भ हा लगेच बॅग उचलून जाण्याचा नाही असा खुलासा त्यांनी केला.

शरद पवारानंतर तुमचे स्थान काय?

अजित पवारांना आमचे काय पडले आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापूरला परत जाईन असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुण्यात कुणी बोलावलेच नव्हते असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता. “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, तुम्हाला बोलावले कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील  यांना लगावल्या होत्या