आता तर अक्षरशः लाज आणली ! पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांची संतापजनक प्रतिक्रिया; पुन्हा साधला राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा

पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झाला. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे. रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय? पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

  पुणे : पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे महाराष्ट्र हादरला आहे. यांवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध करत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे.

  पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झाला. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे. रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय? पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

  आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, राज्यात अत्याचारांची परिसीमा झाली आहे. गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेला नाही. दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की असं म्हणात त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर निशाणा साधला आहे. शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत.

  काय आहे पुण्यातील गँग रेप प्रकरण

  पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणकरून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी ८ आरोपींना अटक केली आहे.याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १३ वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

  पुणे गँग रेप प्रकरणी चित्रा वाघ यांनी संतापजनक प्रतिक्रिया
  काय म्हणाल्या चित्रा वाघ – पाहा व्हिडिओ