…आता आमचे लाईट बिलही भरा

पैसे नसल्याने नागरिकांची नगरसेवकांकडे धाव पुणे : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला, पैसे नसल्यामुळे अन्नधान्य संपले, रेशनिंगचे धान्य लवकर मिळेना अशा तक्रारी घेऊन नगरसेवकांकडे आलेल्यांना अन्नधान्य, शिधा

पैसे नसल्याने नागरिकांची नगरसेवकांकडे धाव

पुणे : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला, पैसे नसल्यामुळे अन्नधान्य संपले, रेशनिंगचे धान्य लवकर मिळेना अशा तक्रारी घेऊन नगरसेवकांकडे आलेल्यांना अन्नधान्य, शिधा पोहोचवण्याचे काम नगरसेवकांनी इतके दिवस केले. मात्र, आता ती गरज संपल्यानंतर लाइट बिल भरायला पैसे नाहीत, महावितरणचे लोक कनेक्‍शन कट करून गेले. बिलाचे पैसे द्या अशा तक्रारी नगरसेवकांकडे वाढल्या आहेत.

काही प्रभागांमध्ये झोपडपट्टी आणि चाळींचा, बैठ्या घरांचा भाग आहे. तेथील अनेकांचे पोट हातावर आहे. येथे नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस पुरेल एवढा शिधा दिला आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेनेही शिधा वाटप केले आहे.

पण, रोजगार नसल्याने अनेकांच्या हातात पैसा नाही. त्यासाठीच आता नगरसेवकांच्या मागे काही नागरिकांनी तगादा लावला आहे. आता आर्थिक मदत कोठून आणि किती देणार हा प्रश्‍न नगरसेवकांपुढे पडला आहे.