आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८० वर ; १६ रुग्णांचा मृत्यू 

मंचर : आंबेगाव तालुक्यात नवीन ८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ७८० झाली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी रविवार दि.२३ रोजी दिली.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे.

मंचर येथे ३१,कळंब येथे ४,अवसरी खुर्द येथे ७,खडकी येथे ८,लांडेवाडी येथे ३,घोडेगांव येथे ४,अवसरी बुद्रुक येथे ७,पेठ येथे ३,धोंडमाळ येथे ४,निरगुडसर,पारगाव तर्फे अवसरी ,कारेगाव,चास,थुगांव, एकलहरे,कानसे,वडगांव काqशबेग येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहेत.तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या ७८० झाली असुन १६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये.तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे,घोडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.