तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी ओबीसी मोर्चाचा पुढाकार : ऋषिकेश रासकर

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड शहरातील ओबीसी समाजातील बांधवां सोबतच समाजाच्या तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा काम करेल, असे आश्वासन ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष-आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चा आयोजित पदाधिकारी बैठक संपन्न झाली. यावेळी रासकर बोलत होते

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड शहरातील ओबीसी समाजातील बांधवां सोबतच समाजाच्या तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा काम करेल, असे आश्वासन ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष-आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चा आयोजित पदाधिकारी बैठक संपन्न झाली. यावेळी रासकर बोलत होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विना सोनवलकर, सरचिटणीस कैलास सानप, योगेश अकुलवार, राजेश डोंगरे, शंकर लोंढे ,ललित म्हसेकर, योगेश वाणी, योगेश मोरे, प्रविण बनकर, संदिप आहेर, महेश सावंत, संभाजी नढे, अभिषेक कर्पे, हरिभाऊ तांदळे, नितीन साळी, अमोल शहाणे, आकाश कळमकर, नितीन साळी, महिला सरचिटणीस सोनाताई गडद, किरण पाचपांडे, जयश्री देशमाने, मनिषा ढोणे, लता हिंदळेकर, शुभांगी मोहळकर, मिना सानप, अपर्णा माटे ,अनुपमा माटे, मीनाक्षी सावंत, ज्योती कोळी, लता माडग्याळ, कविता पवार, सविता कांबळे, निता गोरे आदी उपस्थित होते.

रासकर म्हणाले की, भाजपाने ओबीसी समाजाला कायम न्याय देण्याचे काम केलेले असून, येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत खंबीरपणे उभा राहील. तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ या संकल्पनेची प्रेरणा घेत ओबीसी मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, अशी माहिती रासकर यांनी दिली.