ओबीसी आरक्षण मोर्चा : समीर भुजबळ, रूपाली चाकणकर पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात ओबीसी आरक्षणच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र यासाठी परवानगी न घेता मोर्चा काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे : पुण्यात ओबीसी आरक्षणच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेसह विविध संघटनानी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र यासाठी परवानगी न घेता मोर्चा काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समता परिषदेच्या वतीने पुण्यात ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा काढण्यात येणार होता. पण या मोर्चाला पुणे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चासाठी परवानगी नसल्यानेच हा मोर्चा पोलिसांनी अडवला.मात्र मोर्चा पुढे घेवन जाणार यावर मोर्चेकरी ठाम असल्याने समीर भुजबळ, रूपाली चाकणकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी समता परिषदेची मागणी आहे. त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार होता

मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये : समीर भूजबळ
राज्यातील ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आम्ही आंदोलनाची तयारी केली होती. मात्र पोलिसानी आम्हाला मोर्चा काढू दिला नाही.” आमची आजही तीच भूमिका आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी व्यक्त केले.