रिक्षात महिलेसमोर अश्लील कृत्य; सहप्रवासी गजाआड

फिर्यादी महिला रिक्षाने आपल्या मुलाला घेऊन वायसीएम रूग्णालयात चालली होती. त्यावेळी मोरवाडी येथे रिक्षात बसलेला आरोपी सोहेब याने महिलेसमोरच अश्लील कृत्य करत विनयभंग केला.

    पिंपरी:  रिक्षात बसलेल्या महिलेसमोर तरूणाने अश्लील कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. मोरवाडी ते वायसीएम रूग्णालयादरम्यान ही घटना घडली. विकृत तरुणाला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. सोहेब इक्बाल कुरेशी (वय ३०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

    पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादी महिला रिक्षाने आपल्या मुलाला घेऊन वायसीएम रूग्णालयात चालली होती. त्यावेळी मोरवाडी येथे रिक्षात बसलेला आरोपी सोहेब याने महिलेसमोरच अश्लील कृत्य करत विनयभंग केला. फौजदार सचिन सूर्यवंशी तपास करत आहेत.