corona

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील जांबुत येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील एकूण १३ जनांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती.  त्यामध्ये १२ जनांचा अहवाल निगेटिव्ह आला असून कोरोना बाधित भाजीविक्रेत्याच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील कोरोना बाधितांची संख्या आता दोन झाली असल्याची माहिती टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड यांनी दिली.        शिरूर तालुक्यातील बेट भागामधील पिंपरखेड येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला होता.या परिसरात कोरोनाच्या  शिरकावामळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना या महिलेच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.मात्र त्यानंतर जांबुत येथील भाजीविक्रेता आणि आता त्याचा मुलगा पॉझिटिव्ह आल्याने बेटभाग व जांबूत परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.      

जांबुत येथे कोरोना पॉझिटिव्हचा दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी मलठण येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.कोरोना बाधित कुटुंबातील सदस्यांचे विलगीकरण करण्यात आले असून लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी सात जनांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांनी भिती न बाळगता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. प्रदीप बिक्कड यांनी केले आहे