बनावट औषधाची विक्री करणाऱ्या दाेघांवर गुन्हा

    लोणी काळभोर : बनावट औषधांची रुग्णास विक्री करून हे औषध कोठून खरेदी केले व कोणाला विकले याबाबत अन्न व औषध प्रशासनाला खुलासा न देता व खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. हे बनावट औषध रुग्णाला विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दाेघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल १३ लाख १२ हजार १२४ रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत.

    ठाण्यातून पोलिसांना मिळाली तक्रार

    याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक श्रृतिका कमसिंग जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सार्थक एन्टरप्रायजेसचे (स. नं. ३७/१/२ मिळकत क्रमांक ३५२१ तळमजळा दुर्गामाता मंदिराजवळ कात्रज बायपास रोड, मंतरवाडी, उरुळी देवाची, ता. हवेली) मालक गणेश शंकरराव कोल्हे (सहारा प्रेस्टीज, स. नं. १७७, सासवड रोड, फुरसुंगी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक एन्टरप्रायजेस येथून इम्युअल ५ एमजी, बीएनओ आडी या बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याची तक्रार ठाणे येथील अन्न व औषध कार्यालकाकडून पोलिसांना मिळाली होती.