Offensive posts about NCP President Sharad Pawar and MLA Rohit Pawar; BJP office bearer arrested

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सचिव प्रदीप गावडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सचिव प्रदीप गावडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

    गावडे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले. शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

    राष्ट्रवादीचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष सागर जावळे यांनी याबाबत केली होती. आक्षेपार्ह ट्विटबाबत १३ मे रोजी जावळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्याहून मुंबईत चौकशीसाठी आणले आहे.

    प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पंढरपूर निवडणुकीदरम्यान रोहीत पवारांच्या प्रचारासंदर्भात काही ट्वीट केले होते. त्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला एफआयआरची कॉपी न देता बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत अटक करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असुनही अटक झाली आहे.

    काही दिवंसांसपूर्वी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंशी छेडखानी करुन सोशल मिडियावर पोस्ट केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी युथ विंगचे दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.