येरवडा कारागृहातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी राख्या

शिरूर तालुका महिला  यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम 

कवठे येमाई  :  आगामी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील येरवडा कारागृहात कार्यरत असणारे,जेलर,अधिकारी,कर्मचारी व कामगारांना राख्या पाठविण्यात आल्या आहेत. हा उपक्रम शिरूर तालुका महिला यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी शिरूर शहर व परिसरातील अपंग,दिव्यांग बांधवाना देखील राख्या व मास्क देण्यात आले. वर्षानुवर्षे येरावडा कारागृहात काम करत असणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कामावर रुजू व्हावे लागते. इच्छा असून देखील त्यांना त्यांच्या कुटुंबासह- बहिणीच्या पवित्र अशा रक्षाबंधनाला सुद्धा थांबणे अवघड होते. याच अनुषंगाने बहिनेचे प्रेम,माया,आपुलकी राखीच्या माध्यमातून मिळावी म्हणून आज महिला यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने येरवडा कारागृहातील जेलर,अधिकारी,पोलीस कर्मचारी तसेच कारागृहातील कामगार यांना राख्या पाठविण्यात आल्या.

यावेळी महिला यशस्वीनी वेल्फेअर फाउंडेशनच्या शिरूर तालुका सचिव नम्रता गवारी,संजना वाव्हळ,पुष्पा जाधव,अनघा पाठक, ज्योती गेंजगे, सुनिता घोडेस्वार व तालुका अपंग संघटनेचे  महेश सोनवणे उपस्थित होते.