नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे अधिकारी त्रस्त ; चर्चा करूण मार्ग काढण्याची युनियनची मागणी

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याचा गेल्या महीन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले हाेते. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढणाऱ्या राजकीय दबावावर चर्चा सुरू झाली. यासंदर्भात कामगार युनियनने सभागृह नेते गणेश बीडकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात युनियनने गंभीर आराेप केले आहे.

  पुणे : महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांकडून हाेणाऱ्या हस्तक्षेपामुे अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहे. या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.

  भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याचा गेल्या महीन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले हाेते. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढणाऱ्या राजकीय दबावावर चर्चा सुरू झाली. यासंदर्भात कामगार युनियनने सभागृह नेते गणेश बीडकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात युनियनने गंभीर आराेप केले आहे. शहरातील इतर क्षेत्रीय कार्यालयांपेक्षा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कामाची पद्धत वेगळी आहे. येथील अधिकारी, कर्मचारी यांना नगरसेवक सांगतील त्याच पद्धतीने काम करावे लागत आहे. स्थानिक नगरसेवकांचे अंतर्गत वाद आणि श्रेय घेण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. मानसिक त्रासामुळे अधिकारी, कर्मचारी हे मानसिक तणावाखाली आहेत. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी बदली करून मिळावी अशी मागणी करू लागले आहे. यासंदर्भात अधिकारी, कर्मचारी यांचे प्रश्न जाणून घ्यावेत, तसेच पक्षाचे गटनेते आणि महापािलकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी युनियनने केली आहे.

  – कामगार युनियनचे आराेप
  * लसीकरण केंद्र काेठे आणि काेणत्या प्रभागात असावे यावरून वाद
  * लसीकरणात नगरसेवकाच्या निकटवर्तीयांना प्राधान्य देण्याचा आग्रह
  * नगरसेवक किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या मर्जीनुसार काम केले नाही तर शिवीगाळ आणि अपमान सहन करावा लागताे.
  * चुकीचे काम नाकारल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक राेषाला सामाेरे जावे लागते.
  * वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नगरसेवक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत.