अरे बापरे ! पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात विनयभंगाच्या ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

धक्कादायक गोष्ट म्हणजे पिंपरीमध्ये एकाच दिवसात विनयभंगाच्या पाच घटना घडल्या असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवसात विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

    पिंपरी:  गेल्या काही दिवसांपासून पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे पिंपरीमध्ये एकाच दिवसात विनयभंगाच्या पाच घटना घडल्या असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवसात विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    निगडी, भोसरी एमआयडीसी, तळेगाव – दाभाडे, हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. निगडी पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने विनयभंगाची फिर्याद दिली असून उमेश शेलार (वय ६०, रा. विवेकनगर, आकुर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला १७ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता जीन्याची साफसफाई करत होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून त्यांना घट्ट मिठी मारली. तसेच त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केले. जर तुला येथे काम करायचे असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार सुलतान जाफर शेख (वय २९, रा. सादिक पेठ, पुâलेनगर झोपडपट्टी, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शेख याने पिडीत महिलेजवळ येत तिचा हात पकडला. तु माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणत पिडीतेला हातावर चापट मारत अश्लील वर्तन केले.

    तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार, उमेश पंडीत कुंभार (वय २०, रा. तळेगाव – दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला रस्त्याने ये – जा करत असताना आरोपी वुंâभार हा त्यांचा पाठलाग करत असे. २०१९ ते १३ सप्टेंबर २०२१ या दरम्यान वारंवार हा प्रकार घडला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार, बहिण – भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव रमेश यादव (वय १८, रा. शिंदेवस्ती, मारूंजी) याला अटक केली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी एकाच अपार्टमेन्टमध्ये राहतात. आरोपी गौरव हा आपल्या मोबाईलवरून महिलेच्या मोबाईलवर घाणेरडे मॅसेज पाठवत असे. तसेच गौरव याने महिलेच्या गाडीला आडवी गाडी घालून अश्लील भाषेत धमकी दिली. त्यानंतर त्याच्या बहिणीने महिलेला मारहाण केली. वाकड – सम्राट चौक येथील घटनेप्रकरणी एका स्विगी डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.