ऑईल कंपन्या तुपाशी…सामान्य माणूस उपाशी ; आर्थिक वर्षांत नफ्यात भरघाेस वाढ

सरकारी मालकीच्या तीन ऑईल कंपन्यांचे आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे. त्याचा संदर्भ घेत वेलणकर यांनी कंपन्यांनी संपलेल्या आर्थिक वर्षात भरमसाठ नफा कमविल्याचे नमूद केले. इंडीयन ऑईल काॅर्पाेरेशनने आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत संपलेल्या आर्थिक वर्षांत साेळाशे टक्के जास्त नफा कमविल्याचे दिसून येत आहे. या कंपनीला २१ हजार ८३६ काेटी रुपये इतका नफा मिळाला.

    पुणे : सरकारी मालकीच्या तीनही ऑईल कंपन्यांनी संपलेल्या आर्थिक वर्षात भरमसाठ नफा कमविला आहे. या कंपन्या तुपाशी असून, इंधनदरवाढीमुळे सामान्य माणुस मात्र उपाशी असल्याची टीका सजग नागरीक मंचने केली आहे.मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यासंदर्भात माहीती दिली आहे.

    ‘‘ पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरु असताना पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहीले हाेते. आता हेच भाव गेल्या अडीच महिन्यांपासून परत वाढू लागलेत. इंधनांचे दर हे संबंधित ऑईल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या किमती व डाॅलरच्या किमती प्रमाणे ठरवतात असा दावा केला जाताे. परंतु आपल्या देशांतील विधानसभा निवडणुकीच्या काळातच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईल आणि डाॅलरचा दर पण कसा काय स्थिर राहताे ? ’’ असा खाेचक सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

    सरकारी मालकीच्या तीन ऑईल कंपन्यांचे आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे. त्याचा संदर्भ घेत वेलणकर यांनी कंपन्यांनी संपलेल्या आर्थिक वर्षात भरमसाठ नफा कमविल्याचे नमूद केले. इंडीयन ऑईल काॅर्पाेरेशनने आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत संपलेल्या आर्थिक वर्षांत साेळाशे टक्के जास्त नफा कमविल्याचे दिसून येत आहे. या कंपनीला २१ हजार ८३६ काेटी रुपये इतका नफा मिळाला. त्यांनी भागधारकांना १२० टक्के लांभाश दिला. बीपीसीएल या कंपनीने ६१० टक्के अधिक नफा मिळविला असून, त्यांना १९ हजार ४१ काेटी रुपये नफा झाला आहे. त्यांनी भागधारकांना ७९० टक्के लाभांश दिला आहे. एचपीसीएल संपलेलया आर्थिक वर्षांत ३०० टक्के अधिक नफा मिळविला असून, १० हजार ६६४ काेटी रुपये त्यांना मिळाले. त्यांनी भागधारकांना २२७.५ टक्के लाभांश दिला आहे. या कंपनीनेही ८८५ काेटी रुपये शेअर बाय बॅक साठी खर्च केले आहेत, अशी माहीती वेलणकर यांनी दिली. काेराेनाच्या कालावधीत सर्वच क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे, परंतु ऑईल कंपन्यांनी घवघवीत नफा मिळविला आहे. या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स केंद्र सरकार च्या मालकीचे असल्याने लाभांशाचा सर्वाधिक लाभ त्यांनाच मिळला आहे असेही त्यांनी नमूद केले.

    ‘‘सर्व सामान्य माणूस निमूटपणे वाढत्या किंमतीचे चटके सोसतो आहे. एका बाजूला केंद्र व राज्य सरकार भरमसाठ कर लावतंय तर दुसरीकडे ऑईल कंपन्या भरमसाठ नफा कमावतायत आणी करोना संकटामुळे मेटाकुटीला आलेली जनता मात्र रोज होणारी दरवाढ असहाय्य पणे सोसतीये .’’

    -विवेक वेलणकर , अध्यक्ष सजग नागरिक मंच पुणे.