सोमवारी जिल्ह्यात १५ जण झाले कोरोनामुक्त

अहमदनगर: नगर जिल्ह्यात सोमवारी सकाळी एकूण १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.त्यातील १३ जणांना वैद्यकीय तपासणी सोमवारी सकाळी नंतर नगरच्या बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. तर २ जणांना लोणी येथील

अहमदनगर: नगर जिल्ह्यात सोमवारी सकाळी एकूण १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.त्यातील १३ जणांना वैद्यकीय तपासणी सोमवारी सकाळी नंतर नगरच्या बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. तर २ जणांना लोणी येथील प्रवरा मेडिकल टस्ट हॉस्पिटलमधून (पीएमटी लोणी )येथून डिस्चार्ज देण्यात आला.यात राहाता तालुक्यातील ०२,संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत ०२,अकोले ०२,नगर शहर ०१,पारनेर तालु क्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.