कोल्हापूरची रेड झोनकडे वाटचाल, आणखी ४ कोरोना बाधित आढळले

कोल्हापूर - आज( दि. १७ मे) सकाळी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून

 कोल्हापूर  – आज( दि. १७ मे)  सकाळी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात  मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने चांगलीच तारांबळ उडाली.आणि जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी सुद्धा वाढली.आता कोरोना रुग्ण संख्या ४० वर गेली असून पैकी १३ जणांना याआधीच डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एक जणाचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे.

आज सकाळी कोल्हापूर मधील २३ वर्षांच्या तरुणीला, शाहुवाडीतील २२ वर्षांच्या तरुणाला, आजरा मधील ४९ वर्षांच्या पुरुषाला तर भुदरगड मधील ३२ वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्वजण १३ आणि १५ मे रोजी सीपीआर मध्ये दाखल झाले होते. यापैकी तिघा जणांनी मुंबई येथून तर २३ वर्षीय तरुणीने सोलापूर येथून प्रवास केला होता.