दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक ; दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

बारामती :  दुचाकी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जैनकवाडी (ता बारामती) येथून एकास अटक केली असून त्याने केलेले दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  लखन कांतीलाल सूर्यवंशी (वय २८वर्षे, रा जैनकवाडी ता.बारामती)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दि १८ नोव्हेंबर रो २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी बारामती तालुका येथे पट्रोलिंग करीत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून जैनकवाडी येथे जाऊन लखन कांतीलाल सूर्यवंशी यास ताब्यात घेतले, तो वापरत असलेली दुचाकी मोटार सायकल ही चोरीची असल्याचे समजले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक मोटार सायकल चोरून आणल्याचे सांगितले .यावरून त्याच्या ताब्यातून २० हजार रुपये किंमतीची एक काळे रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल , २० हजार रुपये किंमतीची एक हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सदरच्या पथकाने वरील २ मोटार सायकल व आरोपी पुढील तपास कामी बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे,पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर ,पो हवा राजपुरे,पोलिस नाईक अभिजित एकशिंगे, विजय कांचन, धिरज जाधव यांनी केली आहे.