मोराची शिकार केल्याने एकास अटक

भिमाशंकर : गोहे खुर्द (ता.आंबेगाव) येथे एका मोरांची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने विजय गभाले याला अटक केली आहे.राष्टीय पक्षी मोर याची अवैद्य शिकार करून विजय

भिमाशंकर :  गोहे खुर्द (ता.आंबेगाव) येथे एका मोरांची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने विजय  गभाले  याला  अटक केली आहे. राष्टीय पक्षी मोर याची अवैद्य शिकार करून  विजय सुनिल गभाले (वय २४)  खाण्यासाठी शिजवत असताना मिळून आला. 

पोखरी घाटा जवळ सुनिल गभाले यांच्या मालकी जागेत मोराची शिकार करून शिजवत असल्याची असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचा-यांना मिळाली. यावरून उपवनसरंक्षक जयरामे गौडा यांच्या सुचने नुसार वनक्षेत्रपाल योगेश महाजन, वनपाल अंचल गवळी, किशोर लोखंडे, संतोष भुतेकर, एन.टी.दळवी, आर.एस.मोहरे, एस.एस.तांदळे, एस.डी.लांडे, वनिता राठोड, बी.डी.पटेकर व इतर कर्मचारी यांच्या मदतीने विजय गभाले यांच्या घरी जावून मृत मोराच्या शरीराचे शिजवलेले मांस व इतर साहित्य जप्त केले. मृत मोराच्या शरिराचे अवयव परिक्षणासाठी हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार आहेत.

तसेच घटनास्थळाचे पंचनामे करून आरोपीला अटक केली व घोडेगाव न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.    पुढिल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन याच्या मार्गदर्शनाखाली अंचल गवळी करत आहेत.