बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढणाऱ्या टाेळीचा छडा एकाला अटक, साथीदारांचा शाेध सुरू

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे,दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कर्ज काढून फसवणुक करणाऱ्या टाेळीचा छडा लावण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शाेध सुरू आहे. बॅंकेने कर्ज प्रकरण मंजुर केल्याचा मेसेज आल्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे,दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कर्ज काढून फसवणुक करणाऱ्या टाेळीचा छडा लावण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शाेध सुरू आहे. बॅंकेने कर्ज प्रकरण मंजुर केल्याचा मेसेज आल्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.

सातारा जिल्ह्यातील प्रितेश शिंदे या व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेतून कर्ज काढून दुचाकी विकत घेण्याचा प्रयत्न झाला हाेता. या प्रकरणी शिंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार अाॅक्टाेबर महिन्यात दिली हाेती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे हे खासगी कामासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या माेबाईलवर एका बॅंकेचा कर्ज मंजुरीचा मेसेज आला हाेता. त्यानंतर शिंदे यांनी संबंधित बॅंकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून मी कर्ज प्रकरण केले नाही, नेमका काय प्रकार आहे याची विचारणा केली. त्यानंतर शिंदे हे बॅंक अधिकाऱ्याला थेट जाऊन भेटले. बॅंकेत गेल्यानंतर शिंदे यांना त्यांच्या नावावर टीव्हीएस ज्युपीटर गाडी खरेदीसाठी कर्ज प्रकरण केले गेल्याचे समजले. तेथे त्यांचे नावाचे आधार कार्ड, व्होटर कार्ड, पैन कार्ड, त्यांच्या नावाच्या आयसीआयसीआय बॅंक खात्याचे स्टेटमेंट व एक चेक आढळले. त्या कागदपत्रापैकी आधार कार्ड हे त्यांचेच होते मात्र त्यावर फोटो व पत्ता त्यांचा नव्हता, व्होटर कार्डही व पॅन कार्ड नंबर त्यांचेच होते परंतु त्यावरील फोटो तिस-याच व्यक्तीचे होते. तसेच बॅंक खातेही त्यांचे नावाने बनावट काढण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली हाेती.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करून संबंधित दुचाकी विक्री करणाऱ्या शाेरुम शी संपर्क साधला. शिंदे यांच्या नावाने दुचाकी खरेदी करणारी व्यक्ती शाेरुम मध्ये आल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आणि फिर्यादी शिंदे हे शाेरुमला गेले. त्या व्यक्तीला पाेिलसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव सुरवातील प्रितेश शिंदे असेच सांगितले. सखाेल चाैकशी केल्यानंतर त्याने त्याचे नाव किरणकुमार शशिकांत पेडणेकर ( वय-३४ रा. नवकर बिल्डींग, फेज २, नायगाव पुर्व, वसई ) असे सांगितले. त्यावेळी त्याने त्याचे साथीदार अनिल नवथले आणि मधुकर सोनावणे यांनी मिळून वेगवेगळ्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा उपयोग दुचाकी वाहने खरेदी करणे व त्यासाठी लागणारे कर्ज प्रकरणे करण्यासाठी केला असल्याचे सांगितले.

संपर्क साधण्याचे आवाहन
आरोपी पेडणेकर हा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेला असुन त्याचे विरुध्द वाशी पोलीस ठाणे नवी मुंबई येथे अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे मोबाईल फोन खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी प्रितेश शिंदे, सुनिल यादव, सुरेंद्र यादव, के स.चौरशीया, अमोल गायकवाड, क्लिओ डिसुझा, विजय पंडीत, निपाणी शिवकुमार व रिषम कनोजीया या नावांनी मुबई व पुणे शहरातील विविध शोरुममधुन बनावट कर्ज प्रकरणे करुन वाहने खरेदी केली आहे. अशा नावांच्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या शोरुममधून वाहन खरेदी/कर्ज प्रकरणे झाली असलेस तात्काळ सहकारनगर पोलीस ठाण्यात ८२७५४२०४८७/०२०,२४२२८११३ च २४२२६६०४ वर संपर्क साधनेचे आवाहन पोलिसांनी केले आहे.