One body after another floated in the canal in Pune; Police pulled out two bodies

पुण्यातील फुरसुंगी गावातील कॅनॉलमधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. कॅनॉलमध्ये एका पुरूषाचा मृतदेह वाहून आला असल्याची माहिती स्थानिकांनी लोणी काळभोर पोलीसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बाहेर काढत असतानाच आणखी एक मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनासा आले.

    पुणे : कोरोना परिस्थितीत उत्तर प्रदेशातील गंगा नदी पात्रात अनेक मृतदेह वाहत आल्याने देश हादरा आहे. अशातच आता पुण्यात कॅनॉलमध्ये मृतदेह वाहत आल्याने खळबळ उडाली आहे.

    पुण्यातील फुरसुंगी गावातील कॅनॉलमधून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. कॅनॉलमध्ये एका पुरूषाचा मृतदेह वाहून आला असल्याची माहिती स्थानिकांनी लोणी काळभोर पोलीसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बाहेर काढत असतानाच आणखी एक मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनासा आले.

    दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यातील एक मृतदेह पुरुषाचा तर दुसरा महिलेचा आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या दोघांचा एकमेकांशी काही संबध आहे का? हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.