fraud

ओसवाल व आरोपी ओळखच आहे. ओसवाल यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. महिनाभरासाठी त्यांनी या आरोपींकडून पंचवीस लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी पैसेही परत केले होते. त्यानंतर आरोपींनी ओसवाल यांना डी. एस. कुलकर्णी यांची महागडी कार पोलिसांनी जप्त केली आहे. कारची किंमत 2 कोटी आहे.

    पुणे : पुण्यातील प्रसिद्ध असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची जप्त केलेली महागडी कार स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ४२ लाखांची फसवणूक केली आहे. न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर तोतया आयपीएस आधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना दिले.

    पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात उस्मान हाशमुद्दीन तांबोळी, अर्शद उस्मान तांबोळी, मन्सूर अब्दुल गफूर सय्यद (तिघे रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ), हमीद सय्यद, अहमद सय्यद (दोघे रा. भवानी पेठ) तसेच सूर्यवंशी नावाच्या एका तोतया आयपीएस आधिकाच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत रौनक दिलीप ओसवाल (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी न्यायालयात तक्रार केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. सेऊल शहा यांनी काम पाहिले आहे.

    ओसवाल व आरोपी ओळखच आहे. ओसवाल यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. महिनाभरासाठी त्यांनी या आरोपींकडून पंचवीस लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी पैसेही परत केले होते. त्यानंतर आरोपींनी ओसवाल यांना डी. एस. कुलकर्णी यांची महागडी कार पोलिसांनी जप्त केली आहे. कारची किंमत 2 कोटी आहे. ही कार स्वस्तात देण्याच्या आमिषाने दाखवले व त्यांच्याकडून ४३ लाख रुपये घेतले. आरोपींनी या व्यवहारात सूर्यवंशी नावाच्या एका तोतया आयपीएस आधिकारी म्हणून मध्यस्थी बोलावले होते. पैसे घेतले. पण, कार दिली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात तक्रार केली होती.