पोलीस ठाणेजवळच्या उड्डाण पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या

पिंपरी : चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (रविवारी, दि. १०) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. उड्डाणपुलावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास महाजन (वय ४०, रा. वाल्हेकरवाडी. मूळ रा. जळगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत कैलास महाजन रविवारी सकाळपासून चिंचवड गावात असलेल्या उड्डाणपुलाच्या परिसरात फिरत होता. त्याने सकाळी दोन पीएमपीएमएल बसच्या खाली जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने अकरा वाजताच्या सुमारास चापेकर चौकातून जुना जकात नाक्याकडे जाणा-या उड्डाणपुलावर जाऊन खाली उडी मारली.

तो उड्डाणपुलावरून उडी मारत असताना नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने तात्काळ रिक्षातून उड्डाणपुलावर जाऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला उड्डाणपुलावर पोहोचण्यापूर्वीच त्याने खाली उडी मारली. त्यात तो जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.