अण्णापूर येथे एकाला कोरोनाची लागण ;  तालुका आरोग्य विभागाची माहिती

कवठे येमाई : शिरूर- मंचर रोडवर असलेल्या अण्णापुर येथील स्थानिक पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून या रुग्णाने शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याची माहिती शिरूर तालुका

कवठे येमाई : शिरूर- मंचर रोडवर असलेल्या अण्णापुर येथील स्थानिक पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून या रुग्णाने शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याची  माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली.  

या अगोदर शिरूर तालुक्यात विशेषेकरून मुंबईतून आलेल्या नागरिकांपैकीच कोरोनाग्रस्त झालेले बहुतांशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे उघड झाले असताना आता अण्णापुर येथील स्थानिक नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अण्णापूर सह शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  

अण्णापूर येथे राहणाऱ्या पुरुषाला त्रास होत असल्याने त्यास शिरूरच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तेथे उपचार करण्यात आले. तेथे जवळच असणाऱ्या एका लॅब मध्ये त्याने एक एक्स-रे काढल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या व्यक्तीचा संशय आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज दि. २९ ला आला असून त्यात हा पुरुष कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. 

गावातील नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी.शासनाने दिलेल्या सर्व अत्यावश्यक नियमांचे पालन करा असे आवाहन या वेळी डॉ शिंदे यांनी केले. तर अण्णापूर मध्ये ज्या भागात हा रुग्ण राहतो तेथे काही जण मुंबई येथून आले असल्याचे ही डॉ.शिंदे यांनी सांगितले.