प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

ओतूर : महामार्गाने पायी घरी जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एकजण जागीच ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

हा अपघात ओतूर जवळ नगर कल्याण महामार्गावरील हॉटेल जय मल्हार समोर रविवारी (दि.११) सायंकाळी ६ वा.३० मि.चे सुमारास घडला असून रामदास पोपट डुंबरे (रा.ओतूर,डोमेवाडी,ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.सदर इसमाचा सहा वर्षांपूर्वी देखील अपघात झाला होता त्या अपघातात त्यांचा एक पाय तुटला होता.रविवारी (दि.११) महामार्गावर फिरत असताना त्यांना अज्ञात वाहणाने उडविले व ते वाहन न थांबताच निघून गेले.
याबाबत मयताचा भाऊ सोनू पोपट डुंबरे यांनी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार विकास गोसावी हे करीत आहेत.