थेरगाव येथे पीएमपीएमएल बसच्या धडकेत एक ठार

संतोष शिंदे हे दुचाकीवरून थेरगावातील आठवण चौकातील पुलाखालून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी काळेवाडी बाजूकडून बीआरटी रोडमधून जात असणाNया पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसवरील चालकाने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

    पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. ही घटना थेरगाव येथे घडली. संतोष देवराम शिंदे (वय ४८, रा. काळेवाडी, रहाटणी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी हनुमंत पांडुरंग पवार (रा. साईनाथनगर, थेरगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक संतोष दत्तात्रय पोळ (वय ३८, रा. जगतापनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    फिर्यादी आणि संतोष शिंदे हे दुचाकीवरून थेरगावातील आठवण चौकातील पुलाखालून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी काळेवाडी बाजूकडून बीआरटी रोडमधून जात असणाऱ्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसवरील चालकाने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये संतोष शिंदे यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी जखमी झाले. यामध्ये दुचाकीचेही नुकसान झाले. वाकड पोलिस तपास करीत आहेत.