कोयत्याने वार करून एकाची हत्या

पुणे : पुण्यातील हडपसर येथे दोन गुंडामध्ये झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शोएब शेख असे खून

पुणे : पुण्यातील हडपसर येथे दोन गुंडामध्ये झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शोएब शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो केवळ २७ वर्षांचा होता. हल्लेखोर जीवन कांबळे आणि त्याचे साथीदार यांच्याशी झालेल्या वादातून त्याचा खूप करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील भेकराईनगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास शोएब शेख हा त्याच्या मित्रासोबत गाडीवर जात होता. तेव्हा हल्लेखोर जीवन कांबळे आणि त्याचे साथीदार यांनी कोयत्याने शोएबवर वार केले. या घटनेत शोएबचा जागीच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मयत आणि हल्लेखोर सराईत गुन्हेगार होते. शोएब आणि जीवन या दोघांच्या नावावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शोएब शेख आणि हल्लेखोर जीवन कांबळे या दोघांमध्ये मागील वर्षी देखील वाद झाला होता. या वादातून अशी घटना घडल्याची माहिती आहे.