रक्ताच्या थारोळ्यात ‘त्याने’ स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवला मेसेज; अंगावर काटा आणणारी घटना

चोरट्याच्या हल्ल्यात एक कार चालक गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना पुण्यात घडली आहे. दोन तांस रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या या कार चालकाने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर मेसेज लिहून ठेवला. अखेरीस एका महिला सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    पुणे : चोरट्याच्या हल्ल्यात एक कार चालक गंभीर जखमी झाल्याची थरारक घटना पुण्यात घडली आहे. दोन तांस रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या या कार चालकाने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर मेसेज लिहून ठेवला. अखेरीस एका महिला सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    प्रमोद किसन घारे (वय ३५ ) असं जखमी कारचालकाचं नाव आहे. नर्‍हेगाव परिसरातील भुमकर चौकात सिद्धी संकल्प सोसायटीत ते राहतात. शहरातील एका नामांकित कंपनीत ते अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात.

    सोमवारी (22 फेब्रुवारी) पहाटे पावणे चारच्या सुमारास पार्किंगमध्ये कसला तरी आवाज सुरु असल्याने प्रमोद यांना जाग आली. त्यांनी गॅलरीतून पाहिले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या स्विफ्ट गाडीच्या दरवाजाशी झटापट करत असल्याचे दिसले.

    प्रमोद यांनी तात्काळ पार्किंगमध्ये धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.चोरट्यापैकी एकाने धारदार चाकूने प्रमोद यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला.

    हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रमोद जागेवरच कोसळले. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ ते रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.
    साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी घारे यांच्या पत्नी कोमल घारे (वय 29) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.