गणेश विसर्जन मिरवणूकीत झालेल्या खूनप्रकरणात एकाला जन्मठेपेची शिक्षा

टिळक रोडला गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना दिपक हा त्यात नाचत होता. तो मिरवणूकीत महिलांना धक्का मारत असल्याने मंडळाचे कार्यकर्त्त्याच्या मुलीस त्याचा धक्का लागला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी शेळके यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकत्र्यांनी दिपकला समजून सांगितल्याने त्याने माफी मागितली. त्यानंतर फिर्यादी हे मिरवणूक सोडून पत्नीला घेण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांचा भाऊ रोहन यांच्यासह इतर कार्यकत्र्यांबरोबर गप्पा मारत उभे होते.

    पुणे : गणेश विसर्जन मिरवणूकीत नाचताना झालेल्या वादातून फरशी डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.

    दिपक सुदाम गायकवाड (वय २७) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. रोहन घोडके (वय ३६) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत रोहन यांचे भाऊ रोहित यांनी पोलीसांकडे ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली होती.

    टिळक रोडला गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना दिपक हा त्यात नाचत होता. तो मिरवणूकीत महिलांना धक्का मारत असल्याने मंडळाचे कार्यकर्त्त्याच्या मुलीस त्याचा धक्का लागला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी शेळके यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकत्र्यांनी दिपकला समजून सांगितल्याने त्याने माफी मागितली. त्यानंतर फिर्यादी हे मिरवणूक सोडून पत्नीला घेण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांचा भाऊ रोहन यांच्यासह इतर कार्यकत्र्यांबरोबर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी दिपक हा त्या ठिकाणी आला व शेळके कुठे आहे. त्याच्या मुलीला धक्का मारलेला नसताना ही त्याने मला मारहाण केली, असे म्हणाला. त्यावेळी रोहन हा शेळके कोठे आहे हे मला माहित नाही असे म्हणाल्याने त्याचा राग मनात धरून ‘तुझा कसा काटा काढतो’ असे म्हणत दिपकने खाली पडलेली फरशी उचलून ती रोहनच्या डोक्यात व हातावर मारून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी काम पाहिले. खटल्यात ८ साक्षीदार तपासले. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी युक्तीवादा दरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांनी गुन्ह्याचा तपास केला.