भोसरी - आळंदी रस्त्यावरील गव्हाणे पेट्रोल पंपामागे आरोपींनी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी नरवडे यांची आल्टो मोटार, प्रशांत व्यंकटराव बिरादार यांची मोटार आणि राजेंद्र ज्ञानदेव पाचारणे यांच्या मोटारीची सिमेंटच्या गट्टूने तोडफोड केली.

     पिंपरी: तीन जणांनी मिळून रस्त्यावर उभ्या केलेल्या तीन मोटारींची तोडफोड करत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच एका व्यक्तीच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना संत तुकारामनगर, भोसरी येथे घडली. आकाश गोविंद शर्मा (वय २२), दशरथ देवकाते (वय २१), राम देवकाते (वय १८, तिघे रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रामदास मनोहर नरवडे (वय ५०, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    भोसरी – आळंदी रस्त्यावरील गव्हाणे पेट्रोल पंपामागे आरोपींनी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी नरवडे यांची आल्टो मोटार, प्रशांत व्यंकटराव बिरादार यांची मोटार आणि राजेंद्र ज्ञानदेव पाचारणे यांच्या मोटारीची सिमेंटच्या गट्टूने तोडफोड केली. यामध्ये तिन्ही मोटारींचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी प्रशांत बिरादार यांच्या खिशातून १ हजार १०० रुपये लुबाडून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.