सुरु असलेल्या पावसामुळे बाजरी काढणीला अडथळा

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी बाजरी काढणीत शेतकरी व्यस्त असले तरी सुरु असलेल्या पावसामुळे बाजरी काढणीला अडथळा येत आहे. पावसामुळे बाजरी पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे बाजरी उत्पादक

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी बाजरी काढणीत शेतकरी व्यस्त असले तरी सुरु असलेल्या पावसामुळे बाजरी काढणीला अडथळा येत आहे. पावसामुळे बाजरी पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

उन्हाळी बाजरी पासून चांगले उत्पादन मिळत असल्याने उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच बाजरीच्या सरमाडाचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होत असतो. त्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. काही शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी काढून पूर्ण झाली असून बाजरीची मळणीही पूर्ण झाली आहे.ज ्या शेतकऱ्यांनी उशिरा बाजरीची पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांची बाजरीची काढणी सध्या सुरु आहे. परंतु सुरु असलेल्या पावसामुळे बाजरी काढणीत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी बाजरीची कणसे काठता येत नाही.तर पावसामुळे भिजलेल्या बाजरीचे सरमाड हे काळे पडले असल्याने जनावरांना चारा म्हणून उपयोग करणे अवघड जाणार आहे. बाजरीचे दाणे काळे पडले आहेत. याचा फटका बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.