पोलीसांची फसवणूक करणारेच मोकाट ..!

पुण्यातीलच अनेक पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर त्यांचेच फोटो असणारे बनावट प्रोफाईल तयार करण्यात आले आहेत. त्यात एका एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या एका मित्राकडून ७४ हजार रुपये उकळण्यात आले होते.

  पुणे : गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी ज्या पोलीसांवर आहे. त्याच ‘पोलीसांची’ फसवणूक करणारे आज ‘मोक्काट’ आहेत. आता तुम्ही म्हणाल पोलीसांची अन फसवणूक अन त्यातही ते करणारे मोक्काट कसे. तर त्याच अस आहे, गेल्या काही महिन्यांपासून पोलीसांचे ‘फेसबुकवर बनावट’ खाते उघडून त्याद्वारे त्यांच्या मित्रांना व ओळखीच्यांना पैसे मागितले जात असल्याच्या घटना घडत आहेत. पण, त्यातील एकही आरोपी अद्याप पुणे पोलीसांना सापडलेला नाही. मग, यात दुर्दैर्वी पोलीस की ते गुन्हेगार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

  पुण्यातल्या गुन्हेगारीबाबत जास्त न बोललेच बरे असे आता पुणेकर म्हणत आहेत. या गुन्हेगारीसोबतच पुण्यात आता सायबर गुन्हेगारीच भूत पुणेकरांच्या मानगुटीवर बसल आहे. रस्त्यावरच्या गुन्हेगारीच्या तुलनेत ते भल मोठ झाल आहे. पण, या गुन्हेगारांना शोधन सायबर पोलीसांना अशक्य प्राय असच आहे. ते आकडेवारीच्या घोळातून स्पष्ट होत. त्यात तांत्रिक गोष्टी आहेत अन गुन्हेगार देखील परदेशी अन परराज्यातील आहेत. त्यांचा शोध घेण व त्यांना पकडून आणन तितकस सहज अन सोप नाही, हेही तितकच खर. प्रत्यकेच्या हातात सोशल मिडीया आला आहे. त्यामुळे प्रत्येकजन बसल्या ठिकाणावरून कामे करतो. तर, व्यावहार देखील ऑनलाईन झाले आहेत. खरेदीपासून विक्रीपर्यंत सर्व काही ऑनलाईन होत आहे. त्याचाच फायदा या सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे.

  सोशल मिडीयासोबतच सध्या फेसबुक, इंस्ट्राग्राम आणि इतर मैत्रीच नात जोडणाऱ्या साईडवरून फसवणूक होऊ लागली आहे. त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण, त्यात दुर्दैवी म्हणजे पोलीसांना देखील या सायबर चोरट्यांनी सोडलेले नाही. कारण, पोलीसांच्या नावाच फेसबुकवर बनावट खात उघडले जात आहेत. त्यानंतर त्यांच्यात जवळच्या व ओळखीतल्या मित्रांना फ्रेंड रिकव्हेस्ट पाठविल्या जातात. त्यांना चॉटिंगवर मेसेज टाकून अर्जंट पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांना पैसे मागितले जातात. अशा पद्धतीने आरोपी पैसे उकळत आहेत. सायबर चोरट्यांच्या या नव्या गोरख धंदामुळे मात्र, सायबर गुन्हेगारीच्या यादीत आणखी एका मोडसची भर पडली आहे.

  पुण्यातीलच अनेक पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर त्यांचेच फोटो असणारे बनावट प्रोफाईल तयार करण्यात आले आहेत. त्यात एका एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या एका मित्राकडून ७४ हजार रुपये उकळण्यात आले होते. तर, काही कर्मचारी व पोलीस निरीक्षकांचे देखील प्रोफाईल बनवून त्यांचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात होता. काही निवृत्त अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. दरम्यान, हे सायबर गुन्हेगार पैसे मिळाल्यानंतर हे खाते पुन्हा बंद करत असल्याचे काही घटनांमधून दिसून आले आहे.

  ही काळजी घ्या…
  – ओळखीच्या मित्राची फ्रेंड रिकव्हेस्ट आल्यानंतर हे खाते त्याचेच आहे का याची खात्री करा…
  – नवीन व्यक्तीची किंवा आपण प्रत्यक्ष भेटलेलो नसलेल्या पण, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळखीतील व्यक्तीने पैसे मागितल्यास त्याचेच खाते आहे का, याची खात्री करा…
  – बनावट प्रोफाईल अन मित्रांपासून सावधान रहा…
  – सोशल मिडीयाद्वारे कोणालाही वैयक्तीक माहिती देऊ नका आणि पैसेही देऊ नका…
  – तुमचे बनावट खाते उघडले असल्यास तात्काळ सायबर पोलीसांशी संपर्क करा…
  – तुमच्या मुळ खात्यावरून त्याचा स्क्रीन शॉट काढून तो बनावट असल्याचा मेसेज द्या…
  – जवळच्या मित्रांना इतर माध्यमातून त्याची माहिती कळवा…

  तक्रार दाखल होत नाही…
  बनावट खाते उघडणे व त्यातून पैसे मागण्यासंबंधित पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली जात नाही. काही प्रकरणात हे दिसून आले आहे. खाते बंद होईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी धावाधाव करतात. ते बंद झाल्यानंतर मात्र पुढे काही होत नाही. तर काहिजण फक्त सायबरकडे रिपोर्ट करतात. मग सायबर पोलीस ते बंद करतात.