घोडनदीवरील तांदळी-काष्टी दरम्यानचा पूल वाहतुकीसाठी खुला करा – तांदळी ग्रामस्थांची मागणी

कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पूर्वभागात टोकास असणारे पुणे जिल्ह्यातील तांदळी गाव व घोडनदी पलीकडे अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी या गावांदरम्यान घोडनदीवर असणारा व दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा पूल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सुमारे ३ महिन्यापासून लोखंडी नळ्या, खांब लावून बंद करण्यात आला आहे.

 कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पूर्वभागात टोकास असणारे पुणे जिल्ह्यातील तांदळी गाव व घोडनदी पलीकडे अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी या गावांदरम्यान घोडनदीवर असणारा व दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा पूल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सुमारे ३ महिन्यापासून लोखंडी नळ्या, खांब लावून बंद करण्यात आला आहे.सरकारने १ जून पासून लॉकडाऊन काही प्रमाणात खुले केले असताना या पुलावरील वाहतूकच अद्याप बंद असल्याने तांदळी व परिसरातील अनेक गावातील गर्भवती माता,रुग्ण,जेष्ठ नागरिक,शेतकरी,दुग्ध व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या पुलावर असणारे अडथळे तात्काळ काढून हा पूल दळणवळणासाठी पूर्ववत सुरु करण्याची मागणी तांदळीचे सरपंच,ग्रामसेवक व ग्रामस्थांनी पुणे जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      लॉक डाउनच्या काळात परिसरातील वांगदरी,खलु दौंड येथील बंद करण्यात आलेले पूल वाहतुकीसाठी चालू करण्यात आले असून तांदळी-काष्टी दरम्यानचा हा पूल अद्यापी बंद का ? अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. नदी पलीकडील काष्टी येथे मोठी रुग्णालये,शेती विषयक साहित्याची दुकाने आहेत. तांदळी येथील घोडनदी पुलावरून मांडवगण फराटा,वडगाव रासाई, परिसरातील इतर वाड्यावस्त्यांसह या मार्गावरून अनेक नागरिकांना काष्टी,दौंडकडे येजा करावी लागते.पुणे – अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते.सध्यस्थितीत वाहतुकीसाठी हा पूल बंद असल्याने तांदळी परिसरातील जेष्ठ नागरिक रुग्ण गर्भवती मातांना उपचारासाठी,शेतकऱयांना बी बियाणे,औषधे,खते आणण्यासाठी तसेच शेती,ट्रॅक्टर,दुचाकी,चारचाकीसाठी पेट्रोल,डिझेलसाठी काष्टी ,दौंडकडे जाणे हा पूल आज ही बंद असल्याने अत्यंत अडचणीचे ठरत आहे. सरकारने पारिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा घेता यावी व खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खाते बीबियाणे,औषधे काष्टी,दौड येथुन आणता यावीत या करीता हा पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी तातडीने सुरु करावा तसेच अत्यावश्यक असल्यास येथे चेक पोष्ट सुरु करावे असेही तांदळी ग्रामस्थांनी पालक मंत्री व संबंधित अधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.