कोविड सेंटरच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विरोधकांचे आंदोलन

विरोधक सभागृहात पोहचण्यापूर्वीच महापौरांनी केली सभा तहकूब

  पिंपरी :  कोविड सेंटरच्या नावाखाली भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विरोधकांनी आज (दि.२२) पिंपरी चिंचवड महापालिकेत निदर्शने केली. ‘बीजेपी हटाव, पीसीएमसी बचाओ’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका सभेत प्रवेश केला. यावेळी नगरसेवकांनी डॉक्टरांचा गणवेश परिधान करून त्यावर निषेधाच्या घोषणा लिहून महापालिका सभेत प्रवेश केला. मात्र विरोधक सभागृहात पोहचण्यापूर्वीच महापौर माई ढोरे यांनी सभा तहकूब केली.

  कोरोनाच्या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात २२ कोविड सेंटर उभे केले होते. यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहेत. भोसरी येथे एका हॉस्पिटलने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये एकही रूग्ण नसताना करोडो रूपये बेकायदेशीरपणे अदा केले आहेत. कोरोनाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

  महत्वाचे विषय नसल्यामुळे महासभा तहकूब – नामदेव ढाके

  महापौरांच्या उपस्थितीमध्ये सभेच्या कामकाजाला सुरुवात व्हायच्या अगोदरच सभा तहकूब करण्यात केलेले आहेत. स्थायी समितीची बैठक सुद्धा आज होती. आणि महापौरांना पायाला दुखापत पण झाली आहे. तसेच महापौरांना कार्यक्रम देखील होते. विषयपत्रिकेवर विषय महत्वाच्या स्वरूपाचे नसल्यामुळे ही सभा ९ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केली आहे.

   

  सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची परंपराच भाजपाने गेल्या चार वर्षापासून सुरू केलीयं. एखादा भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर सभागृहात चर्चा देखील करून देत नाहीत. गेल्या बैठकीत चुकीच्या पद्धतीने स्थायी समिती सदस्यांची निवड केली. आज कोविड सेंटरच्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा झाली असती. परंतू भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे होऊ नये म्हणून सभा तहकूब करून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे.

  राहुल कलाटे - शिवसेना गटनेता