बोगद्याचा प्रतीकात्मक फोटो
बोगद्याचा प्रतीकात्मक फोटो

आठ कोटींच्या ई-बस घ्या सर्वेक्षणासाठी ८ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. तीन वर्षांपूर्वी या बोगद्यासाठी ६० कोटींचा खर्च होता. परंतु, हा खर्च आता २५० कोटी रुपये होईल, असे महापालिका म्हणते. तीन वर्षांत खर्च चौपट कसा झाला? तसेच ८ कोटी रुपयांचे। सर्वेक्षण करण्यापेक्षा त्या पैशांतून ई-बस घेऊन नागरिकांना किफायतशीर प्रवासाची सुविधा द्यावी,अशी मागणीही कृती समितीने केली आहे.

  पुणे : कोथरूड-पाषाण पंचवटीतील नियोजित बोगद्याला पाषाण, औंध, बाणेर परिसरातील रहिवाशांसह सुमारे १३ स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही त्यांनी साकडे घातले आहे. या बोगद्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. कोथरूडमधील सुतारदरा ते पाषाण पंचवटी दरम्यान बोगदा तयार करून त्यातून रस्ता करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च होतील. या बाबत महापालिकेने सुरू केलेल्या प्रक्रियेला बाणेर-पाषाण लिंक रोड एरिया सभा, डेक्कन जिमखाना परिसर समिती, पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, वेताळ टेकडी फ्रेंड्स ग्रुप, एन्व्हार्यमेंट क्लब ऑफ इंडिया, पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन, उडाण फॉर चेंज आदी संस्था, संघटनांनी आक्षेप घेतला आहे. वनाज-रामवाडी आणि हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर मेट्रो होत आहे. त्यामुळे या बोगद्याची गरज राहणार नाही. वेताळ टेकडी, पाषाण आणि कोथरूडमधील सुतारदरा येथील जैवविविधता नष्ट करून काय साध्य होणार?, असा प्रश्न नागरी कृती समितीचे प्रदीप घुमरे यांनी उपस्थित केला आहे.

  – सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू
  याबाबत महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, कोथरूड-पाषाण पंचवटी बोगद्याचा समावेश शहराच्या विकास आराखड्यात आहे. सध्या त्या बाबतचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार होईल. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यावर काम सुरू होईल.

  आठ कोटींच्या ई-बस घ्या सर्वेक्षणासाठी ८ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. तीन वर्षांपूर्वी या बोगद्यासाठी ६० कोटींचा खर्च होता. परंतु, हा खर्च आता २५० कोटी रुपये होईल, असे महापालिका म्हणते. तीन वर्षांत खर्च चौपट कसा झाला? तसेच ८ कोटी रुपयांचे। सर्वेक्षण करण्यापेक्षा त्या पैशांतून ई-बस घेऊन नागरिकांना किफायतशीर प्रवासाची सुविधा द्यावी,अशी मागणीही कृती समितीने केली आहे.

  – बोगद्यावरील आक्षेप
  बोगद्याचा आराखडाच सदोष, दाट लोकसंख्येकडे दुर्लक्ष पाषाणपेक्षा औंध, बाणेरमधील वाहतूक कोंडी सुटण्याची गरज मेट्रोमुळे कोंडी सुटणार असल्यामुळे बोगद्याची गरज काय? वेताळ टेकडीवरील जैवविविधता नष्ट होणार १५ हजार झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे.