दुध दरवाढीबाबत आंदोलन हा विरोधकांचा दुटप्पीपणा : महेश पासलकर

दौंड :  भाजप व मित्रपक्ष यांनी दुध दरवाढीबाबत शनिवार (ता.०१) रोजी चौफुला येथे केलेले आंदोलन हे पुर्णता राजकीय स्टंटबाजी असून, विरोधकांचे हे आंदोलन म्हणजे दुटप्पीपणाचा कळस असल्याची टीका शिवसेनेचे उप-जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे केली आहे, 

 यावेळी राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून, राज्यातील राज्य सरकार दुध उत्पादकांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असताना देखील दुध दर वाढीबाबत भाजपाने कधीही ठोस भूमिका घेतली नाही. केंद्रातील भाजप सरकारने दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय घ्यायचा आणि राज्यात राजकीय स्टंटबाजी करून विरोधकांनी दुध दर वाढीची मागणी करायची म्हणजे दुटप्पीपणाची आंदोलन केले जात आहे,

    केंद्रातील भाजप सरकारचा दुध भुकटी आयातीचा निर्णय शेतकरी दूध उत्पादकांना आर्थिक संकटात टाकणारा आहे, या निर्णयामुळे राज्यातील दुध उत्पाकादांना योग्य तो भाव मिळत नाही. जर राज्यातील भाजप नेत्यांना शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असेल तर त्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावे. विरोधकांनी दौंड तालुक्यात दुध दर वाढीबाबत केलेले आंदोलन हे निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे, विरोधकांचा राजकीय दुटप्पीपणा शेतकरी नक्कीच ओळखून असल्याची टीका शिवसेनेचे उप- जिल्हा प्रमुख महेश पासरकर यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे विरोधकांवर निशाणा साधला आहे,