onion farm affected due to rain

राजनी: उत्तर पुणे जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस गेले दोन दिवस पडल्याने चांगलीच दाणादाण उडाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात सततच्या पावसाने काढणीला आलेल्या अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस आणि कांदा पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आंबेगाव, जुन्नर तालुक्यात ऊस आणि कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

राजनी: उत्तर पुणे जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस गेले दोन दिवस पडल्याने चांगलीच दाणादाण उडाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात सततच्या पावसाने काढणीला आलेल्या अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस आणि कांदा पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आंबेगाव, जुन्नर तालुक्यात ऊस आणि कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शनिवारीपासून पाऊस थांबल्याने शेतीची कामे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाचा कहर यावर्षी याची डोळा याची देही पाहिला मिळाला. या पावसाने गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागा देखील अडचणीत आल्या या बागांना लगडलेली डाळिंब पेरू ही फळे पावसामुळे जमिनीवर पडली. त्यामुळे फळबागांचे देखील परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड जुन्नर या तीन तालुक्यात खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वास्तविक पाहता न भूतो न भविष्यती असा परतीचा पाऊस यंदा प्रथमच शेतकऱ्यांना पाहायला मिळाला ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाला आहे.
परतीच्या पावसाने उसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. झालेल्या पावसामुळे काढलेले भात पीक देखील धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आदिवासी पश्चिम भागात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्तर पुणे जिल्ह्यातील भातशेती देखील संकटात सापडली आहे. अनेक भात खाचरात पाणी साचल्यामुळे भाताच्या लोंब्या पाण्यातच तरंगताना दिसतात त्याचा परिणाम भात उत्पादनावर होणार हे मात्र नक्की.

-शेतकामाची कामे खोळंबली
गेले आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातत्याने पडणार्‍या पावसामुळे प्रत्येक गावातील नदी नाले ओसंडून गेले. अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील वाहतुकीचे मार्ग बंद पडण्याचे देखील प्रकार घडले मात्र शनिवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे शेतकामाची खोळंबलेली कामे आता पूर्वपदावर आली आहेत.

उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड आणि जुन्नर या तालुक्यात परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादाण करून टाकली. लागवडीपासून ते काढणीपर्यंत आलेले भाताचे पीक पडलेल्या परतीच्या पावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे भाताची नुकसान पाहून अक्षरशहा डोळ्यात पाणी येते.

-रमेश लोहकरे, आहुपे गावचे माजी सरपंच