voter

लोणी काळभोर  : ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षीक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यामधुन, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उप आयुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत.

लोणी काळभोर  : ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षीक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यामधुन, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उप आयुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन ग्रामपंचायतीसह राज्यभरातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या मतदारयादीत, संबधित ग्रामपंचायतीच्या शेजारील गावातील मतदारांची नावे घुसडल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या होत्या. दरम्यान निवडणुक आयोगाने दिलेल्या वरील आदेशामुळे, नवीन वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या राज्यभरातील १४२३५ ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या शुद्द होणार आहेत.

या निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने प्रसिध्द केलेल्या मतदार याद्यात, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील अनेक मतदारांची नावे आली असल्याची बाब उघडकीस आली होती. सदोष मतदार याद्याचा सर्वाधिक फटका लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना बसला होता. लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही बड्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत दौंड तालुक्यातील हजारो मतदारांची नावे घुसडल्याचे उघडकीस आले होते. याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी मतदार याद्या दुरुस्तीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच, निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणुक आयोगाने आदेश दिल्याने, राज्यभरातील चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणुक आयोगाच्या वरील आदेशाबाबत बोलतांना शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर म्हणाले, ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता विनासायास यावी या उद्देशाने पुर्व हवेलीमधील कांही बड्या नेत्यांनी मतदार यादीत दौंड तालुक्यातील विविध गावातील हजारो मतदारांची नावे घुसडली होती. लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एकाच प्रभागात दौंड तालुक्यातील भरतगाव व कासुर्डी या दोन गावातील चारशेहुन अधिक नागरीकांची नावे घुसडली होती. याबाबत योग्य कागदपत्रे व पुराव्यासह निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. लोणी काळभोर, उरुळी कांचन प्रमानेच राज्यभरात हजारो ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यात अशाच8 पध्दतीने नावे घुसडली होती. निवडणुक आयोगाने आमच्यासह, आमच्या सारख्या राज्यभरातील हजारो तक्रारकर्त्याची तक्रारीची दखल घेतल्याने, आगामी निवडणुका सुरळीत पार पडणार आहेत.