मुकादमवाडीत केले रक्तदान शिबिराचे आयोजन

कुरकुंभ : आज कालच्या जमान्यात तरुण मुलांचा वाढदिवस  म्हटलं की, मित्रांबरोबर पार्टी,मित्रांसोबत केक कापत वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची इच्छा असते. अलीकडे तर वाढदिवस म्हणजे हा एक प्रकारचा सेलिब्रेशन इव्हेंट ठरू लागला आहे.

 कुरकुंभ : आज कालच्या जमान्यात तरुण मुलांचा वाढदिवस  म्हटलं की, मित्रांबरोबर पार्टी,मित्रांसोबत केक कापत वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची इच्छा असते. अलीकडे तर वाढदिवस म्हणजे हा एक प्रकारचा सेलिब्रेशन इव्हेंट ठरू लागला आहे. त्यातून काही लोक समाजाचे ऋण म्हणून वाढदिवसानिमित्त अनाथआश्रम किंवा मूकबधिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात. मात्र, पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील व कुरकुंभ औद्योगिक वसाहत लागत असणाऱ्या मुकादमवाडी  येथील अविनाश चव्हाण आणि त्यांच्या मित्र परिवाराने  वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करीत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्ताचा तुटवढा असल्याने वाढदिवसाचा खर्च टाळून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .रोटरी ब्लड बँक यांनी रक्त संकलन केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

 
 या शिबिरात अनेक तरुणांनी यांच्यासह विविध वयोगटातील महिला ,पुरुषांनी  उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.   दरवर्षी अशाच पध्दतीने वाढदिवस साजरा करून रक्तदात्यांची संख्या ही वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अविनाश चव्हाण यांनी व  यांच्या मित्र परिवार यांनी सांगितले. यावेळी  उद्योजक एस.पी शितोळे,  डॉ समीर शितोळे, सरपंच छाया झगडे, उपसरपंच शोभाताई जाधव, नवनाथ गायकवाड , सूर्यकांत भागवत, बापू झगडे, चंद्रकांत जाधव , हनुमंत चव्हाण, राहुल जाधव, सतीश जगताप, हे उपस्थित होते